Wednesday, February 26 2020 8:23 am

भारतीय डाक विभागाने “ महालॉगीन दिवस ” या उपक्रमाद्वारे ठाणे जिल्ह्यातील ११,०६६ नागरिकांची IPPB बँक खाती उघडली

ठाणे : डाक विभागाची धोरण अंमलबजावणी आणि कार्यवाहीतील उत्कृष्टता यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात नेहमीच उत्प्रेरक म्हणून काम केले आहे. भारतीय डाक विभाग, साध्या, सोप्या आणि  वैविध्यपूर्ण योजनांमधून, पोस्ट ऑफिस सेविंग बँक तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे कार्यक्षम बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे आणि भारत देशास “डिजिटल इंडिया” बनवण्यास सक्षम करत आहे.

 

नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रेखा रिज़वी व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ठाणे जिल्हा क्षेत्र व्यवस्थापक स्वाती जाधव यांच्या निर्देशनाखाली ठाणे टपाल विभागाअंतर्गत येणाऱ्या ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड येथील ५५ टपाल कार्यालये व ९१ शाखा डाकघरांमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने  “ महालॉगीन  दिवस ” या उपक्रमाद्वारे  ११,०६६ नागरिकांची IPPB बँक खाती उघडण्यात आली, तसेच जवळपास ३०० आधार एनेबल्ड पेमेंटस (एइपिस) चे व्यवहार करण्यात आले. या उपक्रमास कमी वेळात नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला, हि बँकिंग सुविधा पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांकडून ग्राहकांच्या दाराशी उपलब्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत ठाणे विभागत आय पीपीबी ची  ३९,०६८ खाती उघडण्यात आली आहेत .

 

सदर IPPB खाते उघडण्यासाठी केवळ रु.१००/- आणि मोबाईल व आधार क्रमांक असणे गरजेचे आहे. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन नसून शिल्लकीवर ४% प्रति वर्ष दराने व्याज दिले जाते. IPPB मोबाईल ऍप द्वारे बिल पेमेंट, NEFT, IMPS, AEPS इत्यादि. सारख्या सुविधा तसेच डाक विभागाचे RD खाते, सुकन्या समृद्धी खाते, पीपीएफ खाते ह्यांचे ऑनलाइन पेमेंट करण्याची देखील सुविधा आहे. IPPB खाते हे सर्व सरकारी अनुदान घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आय पीपीबी द्वारे अद्धार सलग्न  डीबी टी ( डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) स्कॉलरशिप ( शिष्यवृत्ती), संजय गांधी  निराधार योजना, संजय गांधी अपंग योजना अशा विविध  योजनाचा  लाभ मिळवता येतो .

 

ठाणे जिल्ह्यातील  मातृवंदन लाभार्थींना सरकारी अनुदानाचा लाभ देण्यासाठी विविध  आरोग्य  केंद्रावर कॅम्प घेऊन  सुमारे ५००० लाभार्थींना  लाभ देण्यात आला. तसेच एइपिस सुविधे द्वारे  नागरिकांना त्यांचा  कोणत्याही बँकेच्या खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध  झाली असून नागरिकांनी त्याचा लाभ घेनाय्स सुरवात केली आहे.

 

सदर IPPB खात्याच्या सुविधांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील  ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड येथील ५५ टपाल कार्यालये व ९१ शाखा डाकघरांमध्ये मिळू शकतो. तसेच अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन याचा लाभ घ्यावा.