Tuesday, July 14 2020 1:26 pm
ताजी बातमी

भारताची चांद्रयान-२ मोहीम यशस्वीरीत्या अवकाशात झेपावल

श्रीहरिकोटा :-  संपूर्ण जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या भारताची  ‘चांद्रयान-२’ रॉकेट इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अंतराळात यशस्वी रित्या  झेपावलं.भारतीयांसाठी हि अभिमानास्पद गोष्ट असून  ही  ‘चांद्रयान-२’ मोहीम  यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांकडून आनंद व्यक्त केला आहे.

जीएसएलव्ही मार्क -३द्वारे चांद्रयान २चे यशस्वी प्रक्षेपण झालं. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटांतच यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चांद्रयान २मधील तांत्रिक समस्या दूर करून हे यान अंतराळात पाठवलं. अपेक्षेप्रमाणे चांद्रयान २ चे प्रक्षेपण उत्तम झालंय. इस्रोच्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली. शास्त्रज्ञांच्या टीमला सलाम करतो, असंही सिवन म्हणाले.