Tuesday, April 23 2019 9:59 pm

भारतरत्न प.पू . डॉ. बाबासाहेब आंबेडकरानां अभिवादन !

ठाणे-: आज भारतरत्न प.पू . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तलावपाळी, ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजक श्री. नंदकुमार मोरे माजी उपसभापती शिक्षण मंडळ, ठा.मा.पा ,काँग्रेस नेते सुरेश पाटीलखेडे, ठाणे शहर काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष प्रेमसागर पाठक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतरावजी पोलाडीया, सौ. शिल्पा सोनाने अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉ. जे.बी यादव, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्योलीत करून अभिवादन केले. या कार्यक्रमांस ठाणे महानगर पालिका मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.