Tuesday, January 22 2019 1:34 pm

भाजप आमदार सीमा हिरेंच्या गाडीला अपघात

नाशिक : नाशिकच्या भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना शुक्रवारी झाली मात्र सुदैवाने सीमा हिरे ह्या सुखरूप आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.कसराजवळ सीमा हिरे यांच्या गाडीला मागून येणाऱ्या मारुती गाडीने धडक दिली.त्यानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकाने समोरिल वाहनचाकाला शिवीगाळ केली.यावेळी दोघांमध्ये झटापटही झाल्याची समजते हिरे यांच्या अंगरक्षकाने समोरच्या वाहनचालकाशी हुज्जत घालतेवेळी स्वत:कडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही बाहेर काढल्याचा आरोप होत आहे मात्र हां वाद पोलिस ठाण्यात मिटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे