Monday, January 27 2020 10:39 pm

भाजपा सोबत युती आहे आणि यापुढेहि राहणार; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

ठाणे : शिवसेना आणि भाजपची युती 2014 नव्हती, पण आता आहे आणि यापुढेही असेल असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात युतीवर शिक्कामोर्तब केले आहे . ठाणेकरांनी अनेक वर्षांपासून भगवा उराशी बाळगला असून शिवसेनेने ठाण्याला भव्य नाट्यगृह देखील दिले आहे,त्यामुळे आता ज्यांना नाटकं करायची आहे त्यांना करू द्या असा टोला देखील उद्धव ठाकरे लगावला आहे.चार वर्षांपूर्वी शिव आरोग्य ही योजना राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र ही योजना राबवता आली नाही, भविष्यात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दाते मिळाले तर ही योजना राबवून महाराष्ट्र निरोगी करू असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले .
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध वास्तूंचे लोकार्पण करण्यात आले .यामध्ये हजुरी येथे जितो ही सामाजिक संस्था आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज रुग्णालयाचे उदघाटन,उथळसर येथील महापालिकेच्या शाळेची पुनर्बांधणी,सामान्य रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी कामाच्या शुभरंभ,फायरब्रिगेड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मशानभूमीचे उदघाटन आणि गडकरी रंगायतन येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या शिल्पाचा समावेश आहे .
जितो संस्थेचा उल्लेख करताना शहरासाठी काही करण्याची इच्छा असणे अशी जाणीव असणारे लोक फार कमी असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी जितो संस्थेचे कौतुक केले . करून दाखवले या शब्दात खूप सामर्थ्य आहे . २०१४ साली शिव आरोग्य या योजेनचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यावेळी ग्रामीण भागातील रुग्णांचा यात विशेष विचार करण्यात आला होता . ग्रामीण भागातील रुग्णांसाठी थेट सॅटेलाईटच्या माध्यमातू तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली. मात्र जर जितो  संस्थेसारखे दाते असल्यास अशी योजना राबवून संपूर्ण महाराष्ट्र निरोगी करून असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. आजकाल जमीन दिसली कि हडप करण्याची प्रथा आहे , मात्र अशा जागा देणारे दाते अजून ही असल्याने शहरात अनेक चांगल्या वास्तू निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जितो एजुकेशन आणि मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते अनंत तरे आदी मान्यवर उपस्थित होते.