Sunday, April 18 2021 11:45 pm

भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, सिपीएम चार पक्षांचे चार उमेदवार विजयी

पालघर: जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात जव्हार जिल्हा परिषद गटांत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि सिपीएम असा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. तर जव्हार पंचायत समितीवर पुन्हा एकदा ४ जागा मिळवत भाजपाच सरशी ठरला आहे.

जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी ४ गटांसाठी शिवसेनेकडून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या गुलाब विनायक राऊत ह्या कासटवाडी गटातून, तर माकपाच्या मनिषा यशवंत बुधर ह्या वावर गटातून, आणि भाजपच्या सुरेखा विठ्ठल थेतले या मागील जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून यांची दुसरी टर्म असून त्या न्याहाळे गटातून तर सुनीता कमळाकर धूम ह्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच कौलाळे गटातून निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, माकप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक एक जागा मिळाली आहे. मात्र जव्हार पंचायत समितीवर पुन्हा एकदा भाजपच सरश ठरला आहे.जव्हार तालुक्यातील पंचायत समितीच्या ८ गणासाठी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ८ पैकी ४ जागा मिळविल्या आहेत. यामध्ये सुरेश कोरडा न्याहाळे गण, विजया दयानंद लहारे साकुर गण, अजित शिवराम गायकवाड सारसून गण, दिलीप परशुराम पाडवी कोरतड गण, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून तीन उमेदवार निवडून आले आहेत. कौलाळे गण चंद्रकांत रंधा, कासटवाडी गणातून मंगला कान्हात, पिंपळशेत गणातून मीरा गावित. तर माकपाच्या ज्योती बुधर ह्या वावर गणातून निवडून आले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीने भोपळाही फोडला नाही.