Monday, June 17 2019 4:51 am

भाजपा पक्षात हूकूमशाही सुरु आहे :शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भारतीय जनता पार्टी ला टाटा करत कॉग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शत्रुघ्न सिन्हा सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. आजही काँग्रेस पक्षप्रवेशानंतर त्यांनी भाजपवर टीका केली. “भाजपचे वरिष्ठ नेते आज मार्गदर्शन मंडळात आहेत. भाजपमध्ये लोकशाहीचं रुपांतर हुकूमशाहीत झालं आहे. मी आजवर देशहिताच विचार केला आहे. माझ्या स्वत:साठी काही मागितलं नाही”, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.

मी भाजप का सोडत आहे? हे सर्वांना माहित आहे, असं त्यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आधीच शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भेटही घेतली होती

“भाजपमधील दिग्गज नेत्याना अपमान झाला आहे. आज भाजप वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाली आहे. मोदी सरकारमधील अनेक मंत्रीदेखील घाबरलेले आहेत. सरकारमधील सगळे निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात”, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला.

“आज भाजपचा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी मी भाजपमधून बाहेर पडत आहे. याचं मला जास्त दु:ख होत आहे. मात्र आनंद या गोष्टीचा आहे की आता मला पक्षातून काढून टाकण्याच्या धमक्या मिळणार नाहीत”, असा टोला शत्रुघ्न सिन्हा यांना लगावला.