Thursday, December 12 2024 7:06 pm

भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर जिल्हाच्या माध्यमातून सदोष ओबीसी जनगणने बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करीत ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सदोष, खोट्या व चूकिच्या जनगणना सर्वेक्षणा संदर्भात निवेदन मा.आमदार संजयजी केळकर व आमदार अॅड.निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली देन्यात आले.

या प्रसंगी भाजपा नेते मा. खासदार किरीट भाई सोमय्या , जिल्हा अध्यक्ष आमदार अॅड. निरंजन डावखरे,ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी, संघठन सरचिटनिस किरण धतुरे, बाबू रामन्ना, महेश सपकाळे , घनश्याम भुयार, नरेश ठाकुर. हे उपास्थित होते, जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांना निवेदन देऊन ओबीसी समाजाच्या तीव्र भावना सरकार पर्यंत पोहचविण्याची विनंती करण्यात आली.