Friday, December 13 2024 10:35 am

भाजपाचे विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची क्षितीज ठाकूर यांची मागणी

विरार 19 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार क्षितीज ठाकुर यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये घुसून भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरले. याचसोबत घटनास्थळी असलेल्या एका बॅगेतून क्षितीज ठाकूरांनी रोख रकमेची पाकिटे, डायरी आणि लॅपटॉप बाहेर काढले आहेत.
असून याबाबत क्षितीज ठाकुरांनी विनोद तावडेंवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी होते.या घटनेची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले . यावेळी हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करत क्षितीज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरले आहे.