Wednesday, June 3 2020 11:05 am

भाजपला उत्तर प्रतिउत्तर देत शिवसैनिक रस्त्यावर गरीबांना केले जेवणाचे वाटप

ठाणे : कोरोनाला रोखण्यात राज्याचे महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रीय असल्याचा आरोप करीत भाजपने शुक्रवारी ठिकठिकाणी आंदोलन केले. त्याला प्रतिउत्तर देत ठाण्यात शिवसेनेच्या वतीने असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या वतीने गरीबांना जेवणाचे वाटप करण्यात आले.
सरकार निष्क्रीय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंगण हेच रणांगण हे आंदोलन सुरु केले. सर्व भाजप कार्यकत्र्याना काळे फित, काळे कपडे आणि काळ्या गोष्टी वापरत सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. मात्र दुसरीकडे त्याला प्रतिउत्तारदाखल ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी कोरोना योद्धा डॉक्टर्स,पोलीस,नर्सेस, सफाई कर्मचारी व अन्य शासकीय यंत्रणा यांना प्रोत्साहन देण्यासाठी भगवे झेंडे हातात घेऊन अनोखे प्रतिउत्तर दिले. यावेळी झेंडे फडकावत गरिबांना अन्न वाटप केले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्या वतीने रोज जेवणाचे वाटप करण्यात येते. मात्र त्यांनी अजूनपर्यंत कधीही शिवसेना पक्षाचे नाव न घेता किंवा झेंडे फडकावले नव्हते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निष्क्रि य असल्याचा आरोप भाजप पक्षाने केल्यानंतर शिवसेनेचे झेंडे बाहेर काढल्याचे विभागप्रमुख जैस्वाल यांनी सांगितले. परंतु कार्यकर्ते आणि भाजप समर्थकांनी आंदोलनाकडे पाठ फिरवत घरामध्ये राहूनच एकंदरीत महाराष्ट्रात होणारी आंदोलनाची मजा बघण्यास पसंती दिल्याचे दिसून आले. त्याच्यापेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गरिबांना जेवण वाटप करताना दिसत होते. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. त्यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार सोबत जगदीश थोरात आदी कार्यकर्ते उपास्थित होते.