Monday, March 8 2021 5:21 am

भाजपच्या माजी नगरसेवकाची करामत, एकच जमिनीची दोनदा विकलीउरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नवी मुंबई :  एकाच जमिनीची दोनदा विक्री करुन एका महिलेची फसणूक केल्याच्याची करामत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी कविता जाधव यांनी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाधव दाम्पत्याच्या विरोधात उरण पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना हा प्रकार उघडकीस आल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भरत जाधव आणि त्यांच्या पत्नी कविता जाधव यांनी आपली जांभूळ पाडा येथील २२ गुंठे जमीन एनआरआय कॉप्लेक्समध्ये राहणाNया रजनी सेहगल यांना जुलै २०१८ मध्ये सुमारे ३० लाख रुपयांना विकली. ही रक्कम रजनी यांनी दोन टप्प्यात जाधव यांना दिली. या जमिनीमध्ये चार घरे आहेत. त्यांची घरपट्टी नावावरुन करून घेण्यासाठी सेहगल गेल्या असता ही जमीन दुसNयाच चार व्यक्तींच्या नावावर असल्याचे त्यांना समजले. जाधव यांनी २०१७ मध्ये सेहगल यांना विकलेली जमीन सुप्रिया सुर्यवंशी, अविनाश बोलभट यांच्यासह चार जणांना विकली होती. या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेहगल यांनी थेट उरण पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवर उरण पोलिसांनी भरत जाधव आणि त्यांची पत्नी कविता जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पैसे मिळाला नसल्याचा कांगावा
रजनी सेहगल यांच्याकडून पैसे मिळाले नाहीत असा कांगावा एका जाहिरातीच्या माध्यमातून जाधव यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात रजनी यांनी दोन टप्प्यात एकदा २० आणि दुसNयांदा दहा लाख रुपयांची रक्कत जाधव यांच्या बँक खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे जामा केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.