Tuesday, January 19 2021 11:09 pm

भाजपच्या ठाणे स्लम सेल अध्यक्षपदी कृष्णा भुजबळ

ठाणे :भारतीय जनता पार्टी ठाणे शहर स्लम (झोपडपट्टी) विभागाच्या अध्यक्षपदी कार्यकुशल कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली.भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन वसंतराव डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत नुकतेच भुजबळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.”स्लम सेल”अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तळागाळातील कार्यकर्त्यासह सर्व स्तरातून भुजबळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ठाण्यात सत्ता नसली तरी,शहरातील बहुतांश विकासकामे व महात्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतुन केली जात आहेत.त्यामुळे,खऱ्या अर्थाने ठाणेकरांचा विकास भाजपच्या माध्यमातुनच होत आहे.आजघडीला ठाण्याचे क्षेत्रफळ १४४ चौ.मी. व लोकसंख्या साधारण २४ लाखाच्या घरात आहे.तरीही,बहुतांश जनता आजही झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करीत आहे.तेव्हा,केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातुन मुलभूत सुविधा व हक्काचे घरकुल देण्यासाठी तसेच,झोपडपट्टीवसियांच्या न्याय हक्कासाठीच्या लढयात कायम अग्रेसर राहणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.तसेच,येत्या काळात स्लम सेलच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे करण्याचा मानस भुजबळ यांनी बोलुन दाखवला.