Monday, June 1 2020 1:14 pm

भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही, भीम आर्मीची धमकी

सोलापूर : सोलापूर मतदारसंघांत जर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात निकाल लागल्यास भाजपचे सर्व कार्यालय फोडणार अशी धमकी भीम आर्मीने दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्याआधीच हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तसेच राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही अशीही धमकीही भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सोलापुरात त्यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याशी होत आहे.दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी भीम आर्मीच्या या धमकीनंतर शांतीचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जाहीर करत प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे. ‘माझं वंचित समुहाला आणि आंबेडकरी समुदायाला आवाहन आहे की जो काही निकाल लागेल आपण तो स्वीकारावा, असं प्रकाश आंबेडकारांनी आवाहन केलं आहे.

राज्यात कोणत्याही प्रकारची दंगल होणार नाही, शांततेचे भंग होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी विनंती करत प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.