Monday, October 26 2020 3:01 pm

भाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी

मुंबई : भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे.

तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपची राज्य कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारीणी जाहीर केली होती.

या कार्यकारणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले होते.