ठाणे 27 – रेतीबंदर, मुंब्रा, काल्हेर, कशेळी, दिवा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात ड्रोझरच्या सहाय्यातून बेकायदेशीर रेती उत्खनन केले जाते. याबाबत ठाण्यातील दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी ठाणे, तसेच तहसीलदार ठाणे युवराज बांगर यांच्या अधिपत्याखालील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर व व मंडळ अधिकारी व तलाठी यांची परत एकदा वाळू माफियांवरती धडक कारवाई केली.
ठाणे तालुक्यामार्फत सतत सदर सात दिवसांनी कारवाई करण्यात येते सतत खाडीमध्ये देखील बोटी मार्फत वाळूमाफियांना धडा शिकवला जातो आज ठाणे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून देखील ठाणे तालुक्याचे नायब तहसीलदार व त्यांचे सहकारी तलाठी युवा मंडळाधिकारी यांनी मुंब्रा खाडीमध्ये मोठी कारवाई केली असून 40 लाखाचा मुद्देमाल हा पाण्यात बुडवून टाकलेला आहे, वास्तविक सदरची जबाबदारी ही महाराष्ट्रमेरीटाईम बोर्डाची आहे, सागरी किनारा पोलीस देखील याच्यामध्ये ठोस कारवाई करू शकतात, कारण की मेरीटाइम बोर्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसेच सागरी किनारा पोलीस यांच्याकडे पूर्णता यंत्रणा असते बोटी असतात यंत्रसामग्री असते, परंतु महसूल विभागाकडे कुठल्या प्रकारच्या बोटीवर यंत्रसामुग्री नसतात, तरीदेखील ठाण्यामध्ये सतत अशा कारवा महसूल विभागामार्फत केल्या जातात, आज ठाण्याचे नायब तहसीलदार श्री दिनेश पैठणकर व त्यांचे मंडळाधिकारी मंडळ अधिकारी श्रीमती चौरे, तलाठी रोहन वैष्णव, राहुल भोईर, श्री कोरे, खानसोळे, सोमा खाकर, सतीश चौधरी, विजय गडवे, श्री गबाळे, श्री बसवराज, श्री नरोटे असे सर्व महसूल तलाठी व मंडळाधिकारी यांनी मिळून 40 लाखाचा मुद्देमाल पकडून तो पाण्याबाहेर अन्नशक्य नसल्यामुळे पाण्यात बुडवून टाकलेला आहे पुन्हा एकदा महसूल खात्याने दाखवून दिलेली आहे की यंत्रसामुग्री नसताना देखील महसूल विभाग आपली कारवाई चौक पणे पार पाडते, आज देखील त्याचा प्रत्यय आलेला आहे, अतिशय धो धो पाऊस असताना देखील महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज खाडीमध्ये कारवाई केलेली आहे, जी कारवाई महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व सागरी किनारा पोलीस यांनी करणे अपेक्षित आहे ती कारवाई आज महसूल खात्याने केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये दखल घेणे आवश्यक आहे थाळीमध्ये 24 तास वेगळी यंत्रणा पुरवणे आवश्यक आहे खाडी मध्ये बोटी देऊन त्याच्यामध्ये संपूर्णतः बोटी ह्या यंत्रसामुग्री ससज्य असल्या पाहिजेत तरच या वाळूमाफियाना आळा बसू शकेल आता या कारवाईनंतर देखील शासनाला ठोस कारवाई करण्यासाठी वेगळी पावले उचलण्याची गरज आहे.