Saturday, June 14 2025 4:04 pm

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन Team DGIPR by Team DGIPR May 21, 2024

मुंबई,30 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच अतिरिक्त माहिती द्यावयाची असल्यास कृषी आयुक्तालयाच्या ddinfor@gmail.com या ई-मेलवर कळविण्यात याव्यात, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.