Sunday, November 18 2018 10:13 pm

बोंडअळीने पोखरलेल्या बोंडाचा हार घालून, राज्य सरकारविरोधात आंदोलन

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर रॉकेल अंगावर ओतून घेत सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बोंड अळीमुळे कपाशीची झालेली नुकसान भरपाईपोटी मदत मिळावी यासाठी कृषी कार्यालयावर मोर्चा धडकला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.२२ डिसेंबर २०१७ रोजी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून बागायतीसाठी ३७ हजार ५०० रुपये मदत जाहीर केली, याला दोन महिने उलटले तरी अंमलबजावणी झाली नाही म्हणून आंदोलन करण्यात आले.