Monday, June 17 2019 5:08 am

बेस्ट कर्मचारी वर्गाचा आज सलग चौथा दिवस

मुंबई-: बेस्ट कर्मचारी वर्गाचा आज सलग चौथा दिवस आहे. बेस्टचा हा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप मानला जात आहे. यापूर्वी 1997 साली बेस्टचा संप तीन दिवस लांबला होता. या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. गुरुवारी (१० जानेवारी) महापौर, पालिका आयुक्त आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत महापौर बंगल्यावर झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारी (११ जानेवारी) संपच सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा संप आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. तर महापालिका कामगार संघटनेनेही या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शनिवारपासून संपावर जाण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला.