Tuesday, July 23 2019 2:13 am

बेस्टचा संप व उद्या रेल्वेचा मेगाब्लॉक यामुळे मुंबईकर हैराण

मुंबई -: सेंट्रल रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही बाजूने जाणाऱ्या लोह-मार्गांवर संबंधित पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तर, उद्याच पश्चिम रेल्वे मार्गावरसुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग तसेच ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीकामानिमित्त जम्बो-ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सार्वजनिक केलेल्या माहितीप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आधीच बेस्टच्या संपाने हैराण असलेला मुंबईकर सुट्टीच्या दिवशी सुद्धा भरडला जाणार आहे