Thursday, December 12 2024 8:17 pm

बेघरांसाठीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून सन्मान

ठाणे 22 – इंडो ग्लोबल सोशल सर्वीस सोसायटीद्वारे दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बेघरांसाठीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून सादरीकरणाचा सन्मान सिग्नल शाळेला प्राप्त झाला.

‘थिकिंग बियॉन्ड शेल्टर’ या संकल्पनेवर इंडो ग्लोबल सोशल सर्विस सोसायटीद्वारे देश व जगभरातील सर्वोत्तम प्रकल्पाना सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. त्यात महाराष्ट्रातील सिग्नल शाळेच्या प्रकल्पाची निवड झाली होली, नॅशनल अर्बन लाईलीहूड मिशनचे सहसचिव राहूल कपुर व संचालिका डॉ. मधू राणी यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले . शहरी बेघरांसाठी देशभर निवारा केंद्र सरकारी स्तरावर चालविले जातात आता या निवारा केंद्राच्या पलिकडे विचार व्हायला हवा व त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण बदल घडविणे आवश्यक आहे. याबाबत देशभरातील सर्वोत्तम प्रकल्पांनी केलेल्या कामांच्या सादरीकरणातून आगामी धोरण ठरविण्या साठी २० व २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता . केंद्र राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी , सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, युएन हॅबिटॅटचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कोणतेही कायमस्वरूपी निवारा केंद्र निर्माण न करता सिग्नल शाळेच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण व पालकांना रोजगार सक्षम करून त्यांचे पुनर्वसन केल्याबद्दल सिग्नल शाळा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला.

समर्थ भारत व्यासपीठ ठाणे महानगरपालिकेच्यावतीने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी सिग्नल शाळा प्रकल्पाचे सादरीकरण केले.