Tuesday, July 23 2019 1:55 am

बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती निमित्त व्यंगचित्रकला स्पर्धा,प्रदर्शन २०१९

ठाणे -: व्यंगचित्रकलेचा प्रसार, प्रचार व व्यासपीठ मिळावे यासाठी शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा दरवर्षी आयोजित करत  आहे.हे स्पर्धेचं हे सहावे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी वय वर्ष १० वरील बालव्यंगचित्रकार, हौशी तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार यांनी   “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ३० X ४२ सेंमी ) पेपर मध्ये,तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख, मोबाईल नंबर, व आपला पत्ता लिहून शिवसेना शाखा, मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दि. २० जानेवारी २०१९ पर्यंत सायंकाळी ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत.

  परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन दि. २३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत असेल. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २३ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वा ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल. या वर्षीच्या विजेत्या व्यंगचित्रकारांना प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या तर्फे त्यांनी चितारलेले “स्वभावंचित्रे” विशेष पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.