Friday, December 13 2024 10:41 am

बारावीच्या परीक्षेत विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

आठही विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; संस्थेने केले कौतूक

ठाणे दि. ८: समाजातील गरजू, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या विद्यार्थ्यांची यशाची मालिका यंदाही कायम असून बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात संस्थेच्या सर्व आठही विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेने त्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ठाणेसह, विरार, बीड, नागपूर, शहापूर, भागातील विद्यार्थ्यांचा समावेश असून, विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखेतील आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय सावंत (८४% विज्ञान ), हरीश सोनोने (७०.२०% विज्ञान), किरण कोळेकर (६०% विज्ञान) कुंदन मंदारे (६९.३३% वाणिज्य) यज्ञेश देशमुख (७७.३३%वाणिज्य), आदित्य सुर्वे (७७% वाणिज्य)’ साक्षी ठीक (८१% वाणिज्य), प्रतीक्षा मोकाशी (८०.५०% कला) आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांच्या कार्यकर्ता पालक (मेंटॉर्स) तसेच करिअर गायडन्स टीमने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा तसेच भावनिक पाठिंब्याचा मोठा वाटा असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.