Thursday, June 20 2019 2:34 pm

“बाप बाप होता है और बेटा बेटा होता है” सुरेश धस यांचा धनंजय मुंडे वर हल्लाबोल

 बीड :महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पुरेसे संख्याबळ असूनही या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला असून भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस विजयी झाले आहेत.

या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना मात दिली असून या विजयामुळे पंकजा यांचं भाजपमधील महत्त्व वाढणार असल्याचे बोलले जात आहे.मतदारांना स्मार्टवॉच आणि आयफोन वाटूनही राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराला परभावापासून वाचवता आले नाही शेवटी “बाप बाप होता है और बेटा बेटा होता है” अश्या खोचक शब्दात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली.