Friday, May 24 2019 8:22 am

बाजी कोण मारणार ! दुसऱ्या पसंतीला पहिली पसंती

ठाणे: कोकण पदवीधर निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असुन या तिरंगी निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राष्टवादी मधून आयात केलेले भाजपचे निरंजन डावखरे,शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टवादीचे युवा नेते नजीब मुल्ला यांच्यामध्ये मुख्य लढत आहे.तर ११ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

         ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे अर्ध्याहून अधिक मते मिळतील तोच विजय निश्चित मानला जातो मात्र ही निवडणूक प्रतिष्टेची बनली असताना तिघांमध्ये चुरस पाहायला मिळाली त्यात ७० टक्के मतदान झाले असताना कोणालाही अर्धी मते पडणार नसल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीचे मते ज्याला जास्त तोच बाजी मारणार अशी देखील काही जाणकाराकाढून समजते.
      ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ८३४, पालघर जिल्ह्यात १६ हजार ९८२, रायगड जिल्ह्यात १९ हजार ९१८, रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजार २२२, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ हजार ३०८ अशी एकूण १ लाख ४ हजार २६४ इतकी नोंदणी करण्यात आली होती. दरम्यान २५ तारखेला झालेल्या मतदानाला मतदाराचा चंगळ प्रतिसाद मिळाला होता. भर पावसात ७०.८० टक्के मतदान झाले होते या वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
     राष्टवादीमध्ये स्थानिक नेत्यांना कंटाळून निरंजन डावखरे यांनी भाजप मध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली तर शिवसेनेमधील जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक संजय मोरे यांना शिवसेनेमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्टवादीने गड राखण्यासाठी मुस्लिम चेहरा नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली होती. तिघांनीही प्रचार बाजी मारली असताना आज होणाऱ्या निकालाचे यश कोणाच्या पारड्यात पडणार हे चित्र संध्याकाळ पर्यंत स्पस्ट होईल.