Tuesday, July 23 2019 2:44 am

 बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता

अलवर-: माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जगत सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मला दगडाचं उत्तर एके-47नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं ते पुढे म्हणाले. सिंह यांचं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालं आहे.

जगत सिंह यांच्या विधानावर अद्याप कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लवकरच यावरुन मोठा वादंग माजण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या या विधानाचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जगत सिंह यांच्या विधानाबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.