Monday, April 21 2025 11:21 am
latest

बनावट अन्न व औषध परवाना वापरुन निविदा प्रक्रियेत सहभागासंदर्भात चौकशी समिती गठीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, 9 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट अन्न व औषध परवाना व दस्तऐवज वापरुन निविदा प्रक्रियेत सहभाग घेवून निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

या समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेस प्रत्यक्ष भेट देवून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल आवश्यक कागदपत्रांसह त्वरित सादर करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अध्यक्ष, डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. शंकरराव चव्हाण, सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड,सदस्य डॉ. सुनिल लिलानी, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे सदस्य श्री. समाधान जामकर, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई हे समितीचे सदस्य आहेत.