Monday, June 17 2019 4:11 am

बटर कंपनीमध्ये बनावटी अमूल बटर तयार करण्यात येत होतं, तात्काळ पोलिसांची कारवाई !

मीरारोड- : काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीतील घोबंदर रोडवर बनावटी बटरच्या कंपनीवर एएसपी अतुल कुलकर्णी यांच्या टीमने धडक काररवाई केली आहे. बनावट बटर आणि त्याला अमूलची पॅकेजींग करण्यात आलं होतं.
या बटर कंपनीमध्ये बनावटी अमूल बटर तयार करण्यात येत होतं. बनावटी अमूल बटर तयार करणाऱ्या 5 आरोपींना पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे आणि  1000 किलो बनावटी बटर आणि अमूलच्या पैकेट जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीला सील केलं आहे तर याचा आता कसून तपास सुरू आहे.

घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील एका गाळ्यामध्ये बनावट अमूल बटर तयार करण्याचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या जागेवर छापा टाकून 1 हजार किलो बनावट अमूल बटरचा साठा जप्त केला. कारखान्यात तयार होत असलेले बटर अमूल कंपनीच्या वेष्टनात पॅक केले जात होते. हे बटर प्रामुख्याने हातगाडी (फास्ट फूड जॉइंट्स), हॉटेल आणि बार येथे पुरवले जात होते. आता कारखान बंद करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी तपासणी चालू करण्यात येत आहे.