Friday, June 13 2025 12:14 pm
latest

बंडखोर आमदारणांना मोठा धक्का अजय चौधरी सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केला आणि शिवसेनेत वादळ आलं.
यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.

अशातच पाठोपाठ भाजपचा हात असल्याचे आरोपही सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. तब्बल चार दिवसांपासून सुरु असलेलं हे बंड आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन हकालपट्टी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती.

यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती लोकवृत्तान्त माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.