Wednesday, February 26 2020 8:26 am

बंडखोरीवर नियंत्रण ठेवण्यास उद्धव ठाकरे समर्थ;चंद्रकांत पाटील

पुणे :-  बंडखोरी किंवा राजीनामा देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेत होत असला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आहेत अशी भूमिका अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.

  भाजपमधील बंडखोरी नोटीस देऊन वा निलंबन करून नियंत्रित करण्याचे काम मी करू शकतो. त्याचप्रमाणे शिवसेना कार्यकर्त्यांची काही प्रमाणात बंडखोरी असेल, तर ती नियंत्रित करण्याकरिता उद्धव ठाकरे समर्थ आहेत. ठाकरे यांनी सरकारवर टीका केली असेल. पण सरकारला कधी अडचणीत आणलेले नाही. जगात सर्वत्र मतभेद आहेत. ते चर्चेने सोडवता येऊ शकतात, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या ‘संकल्पनामा वचननाम्या’च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते
 मी मूळचा मुंबईकर आहे. कोल्हापुरात ज्यावेळी स्थायिक झालो, त्यावेळी सुरुवातीच्या काळात त्याठिकाणी काम करताना मला विरोध झाला. मात्र, आज अशी परिस्थिती आहे, की कोल्हापूरमधील दहा मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघात मला उभे केले, तरी मी निवडून येऊ शकतो. हीच परिस्थिती पुण्यात येण्याकरिता थोडावेळ जावा लागेल. कोल्हापुरात अनेक सामाजिक कामे केली असून,  नागरिकांसाठी करण्यात आलेली कामे उल्लेखनीय आहेत.  असे  आमदार चंद्रकांत पाटील  म्हणाले