Wednesday, February 26 2020 9:49 am

बँका तीन दिवसाची बंद पुकार !

मुंबई : वेतनाबाबतची चर्चा निष्फळ झाल्यानंतर भारतीय बँक संघटनेने (आयबीए) या महिन्यामध्ये दुसऱयांदा बँक संप करण्याचे आवाहन केले आहे. आयबीएकडून 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला संप पुकारण्यात येणार आहे. याअगोदर 8 जानेवारीला देशव्यापी बंदमध्ये सहा बँक कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी होणारा बँक संप महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच्या एक दिवस अगोदर 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे. अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सरकारसमोर आर्थिक परिस्थितीच्या समस्येला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान आहे.

दोन दिवसाच्या संपानंतर 2 फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे बँकां बंद राहणार आहेत. संपामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यामुळे सर्वसामान्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. बँका बंद असल्यामुळे एटीएममध्ये रोकड कमतरता भासणार आहे.