Monday, March 24 2025 5:42 pm

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू

ठाणे 2 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवार, दि. 09 नोव्हेंबर 2023 ते बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये दिवाळी हा सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. दिवाळी उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून आकाश कंदिल प्रज्वलित करून हवेत सोडण्यात येत असतात. परिणामी हे पेटते कंदिल जमिनीवर येवून एखादी अनुचित गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवेत प्रज्वलित करून सोडण्यात येणाऱ्या आकाश कंदिल (Flying Lantern) उडविण्यावर, विक्रीवर व साठा करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने दि. 09 ते दि. 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ठाणे आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रज्वलित आकाश कंदील (Flying Lantern ) हवेत सोडण्यावर (उडविण्यावर) विक्री करणे व साठा करण्यावर श्री. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लघंन झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.