Wednesday, April 23 2025 1:20 am

फराळ विक्रीतून मिळतो २०० महिलांना रोजगार..

आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात ठिकाणी केंद्रे..

ठाणे 2 – आंबा महोत्सवातून आंबा उत्पादकांना मदतीचा हात देणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून सुमारे २०० महिलांना रोजगार मिळतो.

दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाण्यात सात ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उद्या गुरुवारी नौपाडा येथे सकाळी 11 वा. आमदार केळकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर कोलशेत, माजिवडे, ब्रह्मांड, हावरे सिटी आणि राबोडी येथे केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. दीड हजार किलो फराळ विक्री करण्यात आला होता. तर सुमारे १२ लाखांची उलाढाल १० ते १२ दिवसांत झाली होती. यातून प्रत्येक महिलेस १५ ते २० हजाराचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार यांनी दिली. घरपोच फराळासाठी ८०८२३७७७११ आणि ९१५२५१११७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास परिवार ही संस्था महिलांना रोजगार ळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक महिला बचत गट या संस्थेशी निगडीत असून परिवाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणा करिता अनेक रोजगाराभिमुख उपक्रम राबवले जातात.