Tuesday, April 23 2019 9:26 pm

प्लास्टिक व्यापाऱ्यांकडून निवडणुकीच्या फंडासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न – राज ठाकरे

मुंबई : प्लास्टिक बंदीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद बोलावली होती . यावेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिक मांडणारा मेसेज फिरत असून प्लास्टिक पिशव्या वापरल्याच पाहिजेत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असं स्पष्ट केलं आहे. तसेच  प्लास्टिक बंदीसाठी इतकी घाई का  आणि  हा निर्णय सरकारचा आहे की विशिष्ट खात्याचा असा प्रश्न राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.तर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी केला.प्लॅस्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावं, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं.काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने घेतलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला राज ठाकरेंनी केलेल्या विरोधाची किनार या वक्तव्याला होती.शेवटी “सगळेच खिशात ५००० घेऊन फिरत नसतात”असे सांगत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली.