Sunday, August 9 2020 10:56 am

प्रियांका गांधींच्या शक्ती प्रदर्शनाचा भाजपाला ह्दरा बसण्याची शक्यता

नवी दिल्ली-: प्रियांका गांधी यांनी लखनऊत रोड शो केला आणि त्यांच्या सक्रिय राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लखनऊ मधल्या शक्ती प्रदर्शनाला आधी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची सेवा करणं हे प्रियांकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रियांकांना आता देशाच्या स्वाधीन करत आहोत असं रॉबर्ट वाड्रा यांनी एक भावुक पोस्ट करत लिहिलं आहे.रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी होत असताना प्रियांका या त्यांना सोडण्यासाठी ईडीच्या गेटपर्यंत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत मी माझ्या पतीला नेहमीच खंबीरपणे धीर देत राहणार,असं सांगितलं होतं. भारतीय कुटुंबात एक स्त्री जे करतं तेच मी करतेय असंही त्या म्हणाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा असून, त्यातील 42 जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे आहे. प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे प्रत्येक मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून तेथील स्थिती जाणून घेणार आहेत. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

प्रियंका यांच्या एंट्रीनंतर भाजप घाबरली आहे आणि त्यातूनच प्रियंका यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता प्रियंका गांधी युपीत दाखल झाल्यानंतर भाजपही अलर्ट झाली असणार आहे.कारण उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांनी आघाडी केल्याने भाजपला मोठा फटका बसणार आहे, अशी शक्यता अनेक सर्वेतून समोर येत आहे.