Sunday, September 15 2019 11:05 am

प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली : शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जे आकडे समोर आले ते पाहून प्रथमच प्रियंका गांधी आज कार्यकर्त्यांसोबत बोलत होत्या. न घाबरता स्ट्राँगरुमबाहेर उभे रहा असे आवाहन यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
मागील रविवारी एक्झिट पोलचे आकडे सर्वांसमोर आले त्यावेळी प्रथमच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अफवा या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी अधिक माहिती करून मग त्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर, राजकीय वर्तुळात फक्त एकच गोष्टीची प्रचंड चर्चा होती, ती म्हणचे एक्झिट पोल. प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात ‘फिर एक बार, मोदी सरकार’ येईल, असेच एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडेल किंवा नाही, हे कुठल्याच एक्झिट पोलमध्ये सांगितले नाही. मात्र, भाजपाप्रणित एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असे चित्र दिसत आहे.