Tuesday, July 23 2019 1:51 am

प्राचार्य, शालेय बस संघटनांचा रस्ता सुरक्षा सप्ताहास उत्तम प्रतिसाद

ठाणे-: रस्ता सुरक्षा सप्ताहाचा भाग म्हणून आज प्रादेशिक परिवहन विभागातर्फे काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सुमारे ५०० प्राचार्य आणि शाळा बस ऑपरेटर यांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी शाळा बसेसच्या बाबतीत सुरक्षा कशी महत्वाची आहे हे सांगून नियमांची व्यवस्थित माहिती दिली.
याप्रसंगी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, शिक्षणाधिकारी श्री बडे, स्कूल बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष उदय दळवी, मुख्याध्यापक संघटनेचे श्री म्हात्रे यांनी देखील आपले विचार मांडले तसेच सुचना केल्या.