Tuesday, June 2 2020 3:53 am

प्रथमच कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हंडी आयोजित; उत्सवाचा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांसाठी

ठाणे :- ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दहीहंडी देखील सद्या पद्धतीने साजरी केली. उत्सवाला लागणार संपूर्ण खर्च कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गृहाउपयोगी वस्तू जमा करून लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आयोजक राजन विचारे यांनी सांगितले.
महाराष्ट्रावर संकट आले असतात शिवसेनेने नेहमीच एक पाऊल पुढे टाकत मदतीचा हात पुढे करीत असल्याचे आयोजन विचारे यांनी सांगितले. पूरग्रस्तांना अनेक वस्तू आणि धान्य पाठवण्यात आले आहे. दरम्यान दहीहंडीचा येणारा खर्च हे देखील वस्तू स्वरूपात पूरग्रस्तांना देऊन माणुसकीच्या हेतूने मदतीचा हात देण्यात आला आहे.
दरवर्षी मासुंदा तलाव जवळ जांभळी नाका याठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात येते. आपला सण साजरा झालाच पाहिजे या उद्देशाने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून दहीहंडीचा सण साजरा करण्यात येतो. मात्र या वर्षी पूरपरिस्थिती बघता पारंपरिक पद्धतीने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हंडी आयोजित करण्यात आली होती. अगदी 2 थरावर ही हंडी फोडण्यात आली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते कॅन्सरग्रस्त मुलांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले