Sunday, September 15 2019 3:43 pm

प्रचारादरम्यान अनुपम खेर यांनी दुकानदाराच्या प्रश्नावर हात जोडून पळ काढला!

चंदीगड :  भाजप उमेदवार किरण खेर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या  प्रचारादरम्यान अनुपम खेर यांची चांगलीच फजिती झाली.चंडीगड येथे प्रचार करत असताना  एका दुकानदाराने भाजपचा २०१४ चा जाहीरनामा दाखवत अनुपम खेर यांना मागील आश्वासनांबद्दल प्रश्न  विचारले. मात्र अनुपम खेर काहीही न बोलता हात जोडून तिथून पळ काढला.किरण खेर चंदीगडमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेर सध्या मोठ्या जोशामध्ये त्यांचा प्रचार करत आहेत.प्रचार कर असताना अनुपम खेर हे काही कार्यकर्त्यांसह एका दुकानात पोहोचले. परंतु दुकानदाराच्या प्रतिक्रियेमुळे अनुपम खेर काहीसे गोंधळले. दुकानदाराच्या हातात भाजपचा मागील लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा होता. जाहीरनामा दाखवत त्याने विचारलं की, “मागील निवडणुकीत तुम्ही काही आश्वासनं दिली होती, यापैकी तुम्ही काय केलं आहे?”
मात्र यावेळी अनुपम खेर यांना कोणतंही उत्तर देता आलं नाही आणि ते तिथून हात जोडून पळ काढला. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या कमेंट्स करुन हा व्हिडीओ शेअर करत आहेत.