Tuesday, November 19 2019 3:59 am
ताजी बातमी

प्रचाराच्या रणधुमाळीत मनसे उमेदवार संदीप पाचंगेंची अटक टळली

ठाणे – रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे ञस्त झालेल्या ठाणेकरांची व्यथा मांडण्यासाठी या खड्डयात मंञ्यांची चिञे रेखाटणार्‍या मनविसेचे जिल्हाध्यक्ष आणि ओवळा – माजिवडा विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप पाचंगेंसह आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज न्यायालयात आरोपपञ सादर करुन संदीप पाचंगेंसह इतर मनसैनिकांना अटक केली जाणार होती. त्यामुळे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत मनसेच्या उमेदवारावर जेलवारी करण्याची वेळ आली होती. माञ पोलिसांच्या निर्णायक भूमिकेमुळे पाचंगेंसह मनसैनिकांची अटक आज टळली. या प्रकरणात पुढील १५ दिवसांनी हजर राहण्याचे फर्मान पोलीसांनी दिले आहे. माञ कितीही केसेस पडू द्या, सर्वसामान्यांसाठी लढा सुरुच ठेवणार असल्याचे मत संदीप पाचंगे यांनी व्यक्त केले. तसेच प्रचार सोडून राजकीय गुन्ह्यात अडकवणार्‍या विरोधकांना ही चपराक असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.

७ आॅगस्ट २०१९ रोजी मानपाडा येथील हॅप्पी व्हॅली परिसरात संदीप पाचंगे व मनसे उप शहराध्यक्ष पुष्करराज विचारे, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे, मनसे शाखाध्यक्ष सागर भोसले, सचिन जांभळे, संतोष निकम, गोकुळ बोरसे, निलेश चौधरी आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी चंद्रकांत पाटील व पालकमंञी एकनाथ शिंदे यांची चिञे खड्डयात रेखाटून या प्रकरणी अनोख्या पध्दतीने निषेध केला होता.