Wednesday, January 20 2021 12:16 am

पोलीस प्रशिक्षण केंद्रात ११८ जणांना कोरोनाची लागण

नाशिक :नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जणांना कोरोना झाला आहे. यात पोलीस, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत उपनिरीक्षक पदासाठी दिलं जातं आहे. दरम्यान सगळ्या करोना बाधितांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटना ताजी असताना नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ११८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे.

कोरोनाबाधितांमध्ये पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचार्‍यांना शहरातील ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रांत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते.