Wednesday, March 26 2025 5:51 pm

पैठण येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

मुंबई, १० : गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते.

या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्या घटनेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

ते म्हणाले की, “शाईफेक करणारे कार्यकर्ते कोणाचे होते याची मला कल्पना नाही, मात्र ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे असतील, मागच्या काही दिवसांपासून महापुरूषांबाबत मंत्री वादग्रस्त विधाने करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना सांगितलं पाहिजे महापुरूषांबद्दल बोलताना शब्द विचार करून वापरावे, सातत्याने अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण गरम आहे, तर त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलं की चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाची दिलगिरी व्यक्त केली आहे यावर थांबलं पाहिजे मात्र ज्यांना आंदोलने करायची आहेत त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने करावीत, कोणालाही इजा होईल अशा प्रकारे आंदोलने करू नये” अस मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.