Tuesday, April 23 2019 10:13 pm

पॅन कार्डला आधार कार्डशी जोडलं गेलं नसेल, अडचणींचा सामना करावा लागेल

मुंबई-: तुम्ही जर पॅन कार्डला आधार कार्डशी जोडलं गेलं नसेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. इन्कम टॅक्सच्या कलम 139एए अनुसार इन्कम टॅक्स अवैध मानलं जाईल. पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे. तरीही अजूनपर्यंत फक्त 50 टक्के लोकांनीच हे काम केलंय. जाणून घेऊया पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करायचं ते अगोदर पॅन कार्ड आधारशी लिंक करायची शेवटची तारीख होती 30 जून 2018 होती. आता ती 31 मार्च 2019 केली गेलीय.

पॅन आधारला जोडलं गेलं नाही तर तुम्ही ऑनलाईन ITR फाइल करू शकणार नाहीत. तुमचा टॅक्स रिफंडही मिळणार नाही. शिवाय पॅन कार्ड अवैध होईल. यासाठी तुम्ही ई-फाइलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) या आयकर विभागाच्या लिंकवर जा. तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंकवर क्लिक करा. तुमचं अकाऊंट बनलं नसेल तर रजिस्ट्रर करा. लाॅगइन केलं तर पेज ओपन होईल. वर दिसणाऱ्या निळ्या रंगाच्या स्ट्रिपमध्ये प्रोफाइल सेटिंग निवडा. प्रोफाईल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करायचं सेटिंग दिसेल. याला सिलेक्ट करा. सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. SMSनंही पॅन कार्ड आधारशी लिंक करता येतं. आयकर विभागानं सांगितलंय 567678 किंवा 56161वर SMS पाठवून तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता.