Sunday, September 15 2019 11:13 am

पूरग्रस्त जिल्यात स्वामी फाऊंडेशन करणार स्वच्छता मोहीम

ठाणे :-  अतिवृष्टी झालेल्या कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झाली असून आता खऱ्या अर्थाने संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. एककिडे सर्वच स्तरातून पूरग्रस्तांना गृहाउपयोगी वस्तूची मदत केली जाऊ लागली असताना दुसरीकडे पूरग्रस्तांनच्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी ठाण्यातील स्वामी फाऊंडेशन सरसावली आहे. स्वामी फाऊंडेशन वतीने 10 हजार लिटर फिनेल, 6 हजार ब्लिचिंग पावडर  बरोबर फौंडेशनचे 100 स्वयंसेवक कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात रवाना झाले आहेत.
         राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा,कोल्हापूर,सांगली या पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाले आहे. दरम्यान त्याचा संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने अनेकांनी मदत देण्याचे ठरवले असताना राज्यातून अनेक मदतीचा पूर सुरू झाला आहे. दरम्यान पूर ओसरायला हळूहळू सुरुवात झाली असून आता खरी लढाई पूरग्रस्तांनच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याची गरज आहे. सद्या या दोन जिल्ह्यात बिकट परिस्थिती असून रोगराई वाढू नये याकरिता स्वामी फाऊंडेशन एक पाऊल पुढे टाकत फिनेल आणि ब्लिचिंग पावडर पाठवण्याचे ठरवल असल्याचे फाऊंडेशन
संस्थापक महेश कदम यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर पूरग्रस्त या दोन जिल्ह्यात 100 स्वयंसेवक स्वच्छता करणार असून कोल्हापूर, सांगली जिल्हा रोगराई मुक्त करण्याचा विडा स्वामी फाऊंडेशन ने उचलला आहे.