Saturday, August 24 2019 11:07 pm

पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली भाजपचा निवडणूक प्रचार सुरु

मुंबई :– कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात बचाव पथकासोबत गेलेले मंत्री गिरीश महाजन हे पूर परिस्थितीत लोकांच्या डोळ्यातून अश्रू असताना बोटीत बसून सहलीला गेल्या सारखे सेल्फी प्रकरण शांत होण्यापूर्वीच भाजपा आणखी एका वादात सापडले आहे.

पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या पाकिटावर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वतःचा फोटो असलेले स्टिकर लावून प्रचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे भाजप सरकार पूरग्रस्तांना मदत करत  करण्याचे सोडून अश्या परीस्थित देखील आपला प्रचार करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सलग दोन दिवस पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना उशिरा मदत केली जात आहे आणि त्यातून अश्या प्रकारे प्रचार केल्याने नागरिकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झालेल्या

हा अत्यंत संतापजनक प्रकार असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे सरकारच्या पैशांवर जाहिरातबाजी करणे योग्य नाही. ह्या लोकांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर प्रसिद्धीसाठी वाटेल ते पाऊल सरकार उचलत ही चमकोगिरी करत आहेत. छुप्या पद्धतीने हे स्टिकर कार्यकर्त्यांना लावायला सांगितले असतील, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. पूरग्रस्तांना तब्बल 2 दिवस मदत स्टिकर छापण्यासाठी दिली नाही. लेकरे-बाळे उघड्यावर पडली आहेत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टिकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीसाठी लोकांना उपाशी माराल, अशी टीका केली आहे.