Saturday, August 24 2019 11:15 pm

पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान , अनंतनागमध्ये चकमक सुरु

जम्मू-काश्मीर : पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दलानं चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. अनंतनागमधील देहरुना गावात भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु आहे. पुलवामातील पंजगाम गावात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून,  दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली आहे

काल रात्री दोन वाजताच्या सुमारास पुलवामा येथे सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्य़े चकमक सुरु झाली. या चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. यातील एकाची ओळख पटण्यात यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.अनंतनागमधील देहरुना गावात चकमक सुरुच

जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमधील देहरुना गावात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने अतिरेक्यांना चहूबाजूंनी घेरण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. तसेच भारतीय लष्कराकडून परिसरात शोधमोहीमसुद्धा राबवली जात आहे.