Monday, June 1 2020 2:04 pm

पुन्हा एकदा चांद्रयान-२ प्रक्षेपणासाठी सज्ज;आज दुपारी २ वाजता प्रक्षेपण

श्रीहरीकोटा – भारताची ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच “इस्रो” पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे आज सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.

१५ जुलै रोजी ठरलेले प्रक्षेपण ज्या तांत्रिक अडचणीमुळे ऐन वेळी पुढे ढकलावे लागले होते, ती अडचण दूर करण्यात आली असून, रॉकेट प्रक्षेपणासाठी पूर्णपणे तयार आहे.

शनिवारी सायंकाळी प्रक्षेपक रॉकेटची आणि इतर अनुषंगिक यंत्रणांची पुन्हा एकदा पूर्णांशाने रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात कोणतीही अडचण किंवा दोष न आढळल्याने प्रक्षेपणासाठी उलटी गणती सुरू झाली आहे. आधी ३ वेळा पुढे ढकललेले प्रक्षेपण १५ जुलै रोजी पहाटे व्हायचे होते. त्यासाठी श्रीहरिकोट्याच्या अंतराळ तळापाशी उभारलेल्या दर्शक दीर्घेमध्ये जगभरातील पत्रकारांसह अनेक मान्यवरही जमले होते, परंतु उड्डाणाला अवघी ५६ मिनिटे शिल्कक असताना प्रक्षेपक रॉकेटमध्ये काही बिघाडाचा संशय आल्याने सावधगिरी म्हणून प्रक्षेपण थांबविण्यात आले होते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान इस्रोने अंतराळातील शत्रूचे सॅटेलाईट पडण्याच्या पराक्रम केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हवा निर्मितीसाठी अप्रत्यक्षरीत्या शास्त्रज्ञांना त्यांच्या मेहनतीवर प्रथम त्यांना काहीच बोलू न देता, स्वतःच सर्व माहिती देशाला देत ‘अंतराळात सर्जिकल स्ट्राईक’ असा बातम्या पेरून स्वतःच्या सार्कची वाहवा करून घेतली होती. त्यामुळे आजच्या प्रक्षेपणानंतर इस्रोतील शास्त्रज्ञांना त्यांच्या अथक मेहनतीवर व्यक्त होण्याची संधी मिळणार की पुन्हा मोदी स्वतःच सर्व ताबा घेऊन, आपल्या सरकारचे गुणगान करणार ते पाहावं लागणार आहे.