Tuesday, July 23 2019 2:18 am

पुण्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त

पुणे -: सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरिसाहून येणाऱ्या कंटेनर क्रमांक आर जे ०२ जीए १६९१ मधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हडपसर येथे सापळा लावला. यावेळी या पथकाने या कंटेनरला अडवून झडती घेतल्यावर कंटेनरमध्ये ८०० किलोचा गांजा आढळून आला.

हा गांजा पथकाने जप्त करून कंटेनरमधील दोघांना अटक केली. हा गांजा सीमा शुल्क विभागाच्या गोदामात ठेवण्यात आला आहे. गांजाची किंमत ७० लाख रुपये असून अधिक तपास पथकाकडून सुरु आहे. ही कारवाई युक्त राजीव कपूर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गोयल, सहआयुक्त राजेश रामराव, अधिक्षक अलेक्झांडर लई यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख, निरीक्षक मुकेश कुमार, हेड हवालदार सुनील कांबळे, संजय पिल्ले, भारत पवार, संजय पिंगळे, यांच्या पथकाने केली.