Tuesday, July 23 2019 2:40 am

पुण्यात शिक्षणाचा मार्ग मोकळा -आजपासून नोंदणी सुरु

पुणे -: शिक्षण हि मानवाची एक अशी देणगी असू शकते कि ती त्याच्यापासून कोणी हिरावू शकत नाही. शिक्षणामुळे माणसाला समाजात हुशारीने वावरण्याचे बल वेळोवेळी मिळते, आयुष्य सुध्र्ण्याच्या विश्वात त्याला मनाचा स्थान हि शिक्षण देऊ शकते म्हणून, शाळेत जाऊन ज्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन तीन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचवी आणि आठवीच्या प्रवेशासाठी आजपासून नोंदणी सुरू झाली. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. पुढील काळात दहावी, बारावीसाठी सुद्धा मुक्त विद्यालयाद्वारे अभ्यासक्रम चालविले जाणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यावेळी उपस्थित होते.