Tuesday, July 23 2019 1:51 am

पुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध

पुणे -: पुणे पोलिसांच्यावतीने 1 जानेवारी पासून हेल्मेट न वापरणाऱ्यां विरोधात सक्त कारवाई केली जात आहे. न्यायलयाने हेल्मेटसक्तीला विरोध केला असताना पुणे पोलिस न हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. पुणेकर, सामजिक संस्था, राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी विविध प्रकारे आदोंलन केले जात आहे.

पुण्यात हेल्मेटसक्तीचा तीव्र निषेध होत आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व पक्ष संघटनांच्या कृतीसमितीच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.  यापुर्वी हडपसर परिसरात हेल्मटसक्तीविरोधात हेल्मेटची प्रेत यात्रा काढण्यात आली होती. तसेच दुखवटा पाळण्यात आला होता. त्याचा एक भाग म्हणून हे आंदोलन आज करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तच्या नावाने बोंब मारण्यात आली.

पुण्यात काही सामाजिक संस्था आणि एनजीओद्वारे हेल्मेट सक्तीचा विरोध होत आहे. दरम्यान वैकुंठात हेल्मेट ला हार घालून त्याच्यापुढे चहा, बिस्कीट, भेळ, वडापाव, पेढे आदींचा नैवेद्य वाहण्यात आला. यावेळी सर्वांनी एकमेकांना बुंदीचे वाटप केले.  यावेळी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, भाजपचे संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, शिवा मंत्री आदी सहभागी झाले होते.