Tuesday, July 23 2019 10:17 am

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली;वाहतूक विस्कळीत

पुणे– शुक्रवारी रात्री आकराच्या सुमारास पुन्हा एकदा नाशिकच्या महामार्गावरील चंदनापुरी घाटात मोठी दरड कोसळली. आठवडाभरात तिसऱ्यांदा दरड कोसळल्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा नुकसान झालेले नाही. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच रात्री पोलीस, महामार्ग कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घाट परिसरात आठवड्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे चंदनापुरी घाटात डोंगराचा काही भाग संरक्षक जाळ्यासह नाशिककडे जाणाऱ्या लेनवर मधोमध कोसळला. सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या घटनेची माहिती घेतली असून दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.